म्हसवड:
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील महाबळेश्वरवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीतील श्रीपती गाढवे हे मेंढ्या चारण्याकरीता रानात गले होते. रानातुन मेंढ्या घरी येताना मेंढ्यांना घेवून येण्यास मदत करणेकरीता त्यांचा ४ वर्षाचा नातु शिवतेज हा महाबळेश्वरवाडी येथील पाइार तलावकडे गेला होता. सायंकाळी ०६.०० वा. चे सुमारास आजोबा श्रीपती गाढवे हे परत येत असताना रस्त्याचे कडेला रक्ताचे थारोळ्यात पडलेला चिमुकल्याला पाहुन मॅढ्या घाबरुन इकडे तिकडे पळु लागल्या. त्यावेळी आजोबांनी पुढे जाऊन पाहिले असता रक्ताचे थारोळ्यात त्याचा नातू शिवतेज पडला होता. त्यावेळी त्याचेवर उपचार करणेकरीता आजोबा श्रीपती गाढवे त्यास घेवून मदतीसाठी आजुबाजुच्या लोकांना हाका मारुन शिवतेज यांस घरी घेवून निघाले होते. त्यावेळी गावातील इतर लोक व मुलास उपचाराकरीता घेवून प्राथमिक आरोग्य, केंद्र म्हसवड येथे आले. त्यावेळी डॉक्टरांनी जखमी शिवतेज यांस तपासुन तो मृत झाल्याचे घोषीत केले. सदरचे मुलाचा अचानक मृत्यु झाल्याची बातमी मिळताच खात्री करणेकरीता पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सदरचे घटनास्थळाचे निरीक्षण करताच पोलीस खाक्याच्या करड्या नरजेला संशयाची सुई टोचू लागली. घटनास्थळ सुरक्षित करुन लहान मुलांच्या प्रेताचा पंचनामा केला.
मयताचे चुलत आजोबा सदाशिव दादा गाढवे यांनी दिले खबरीवरुन मयत शिवतेज सचिन गाढवे यांचे मृत्युची चौकशी मा.श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व मा. श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी, मा. श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे, शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू झाली. मयतेची चौकशीकरीता म्हसवड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, श्री. एस.आर. बिराजदार, सहा. पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक, यांचे अधिपत्याखाली दोन पथके तयार करुन चौकशी सुरू केली.
सदरचे चौकशीमध्ये पोलीसांना मयत शिवतेज यांस कोणी मारले असावे ?, का मारले असावे?, लहान शिवतेजला ? मारण्याचे नेमके काय कारण असावे हे प्रश्न भेडसावत होता तो सोडविण्याचा म्हसवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कसोशिने प्रयत्न करत होते. परंतु ज्याच्याकडे संशयाची सुई जात होती. परंतु एकाच घरात राहणा-या कोवळ्या नात्यातील शिवतेजच्या चुलत्यावर संशय घेणे अवघड जात होते. सदर शेवटी मयत हा शेवटी ज्याचे सोबत मेंढ्यांना आण्याकरीत गेला होता व मयताचे आजोबा यांचे पुढे मॅढ्या घेवून येणारा त्याचा चुतला आकाराम गाढवे यांचेकडे तपास सुरू केला. परंतु काहीएक हासिल होत नव्हते. मयत हा मेंढ्या आण्याकरीता ज्याचे सोबत गेला होता. तो आकाराम गाढवे यांचा मुलाग समर्थ गाढवे हा होता त्यांचे वय ८ वर्षे होते. त्यांचेकडे तपास करणे जिकरीचे होवू लागले. पोलीसांनी शिवतेज पेक्षा लहान होवून त्यांचेशी गट्टी करुन त्यांचेकडे चौकशी केली असता समर्थ गाढवे याने पोलीसांना सांगितले की, मी आमच्या मेंढ्यांना आडवे गेलो होतो व शिवतेज हा त्यांचे आजोबाचे मेंढ्यांना आडवे गेलो असल्याचे सांगितले व आमच्या मेंढ्या पहिल्यांदा आल्या त्यावेळी मी व शिवतेज रस्त्यावर बसलो होतो. त्यावेळी आम्हांला मॅड्या भुजल्या त्यावेळी मी रस्त्याचे बाजुला गेलो व शिवतेज रस्त्यावर थांबला शिवतेज यांस माझे पप्पा यांनी बाजुला हो असे सांगितले परंतु शिवतेज हा बाजुला गेला नाही याचा राग माझ्या पप्पाना आला त्यावेळी पप्पांनी त्यांचे हातातील दगड शिवतेज यांचे डोक्यात मारला त्यावेळी शिवतेज खाली पडला त्यावेळी पप्पांनी पळत जावून पुन्हा शिवतज यांचे डोक्यात दगड घातले त्यावेळी शिवतेज हा तेथेच पडून होता व आम्ही घरी निघुन आलो असे सांगितले.
त्यानंतर चौकशी करीता आकाराम धोंडीराम गाढवे रा. महाबळेश्वरवाडी ता. माण जि. सातारा यांस ताब्यात घेतले त्यास खाकी हिसका दाखवताच त्याने आपले तोंड उघडुन शिवतेज सचिन गाढवे रा. महाबळेश्वरवाडी हा मेंढ्याचे येण्याचे रस्त्यावर बसला होता त्यावेळी मेंढ्या घाबरल्या म्हणून मी त्यास रस्त्याचे बाजुला हो असे सांगितले असता तो रस्त्याचे बाजुला गेला नाही म्हणुन मी रागाचे भरात त्यांचे डोक्यात दगड मारुन जिवे ठार मारले असल्याचे सांगितले. त्यावेळी गुन्ह्यांचे चौकशी अंती श्री. अनिल वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक, म्हसवड पोलीस ठाणे यांनी फिर्यादी दिली असुन आरोपी आकाराम धोंडीराम गाढवे, रा. महाबळेश्वरवाडी ता. माण जि. सातारा यांस अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सो, सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा. श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधीकारी सो, दहिवडी उप विभाग, व श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अकस्मात मयतेचा तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व श्री. विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा- सातारा व अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत आपल्या कौशल्याचा परिपूर्ण वापर करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघड केला.
सदरची कामगिरी मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सोो, सातारा मा., श्रीमती. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सोो, सातारा व मा. श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोो, दहिवडी विभाग, दहिवडी व श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे, शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, अनिल वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक, व अमंलदार अमर नारनवर, रुपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतिष जाधव, संतोष काळे व स्थागिक गुन्हे शाखा, सातारा कडील श्री. विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार अमित सपकाळ, गणेश कापरे, ओंकार यादव, यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.