Site icon Tufan Kranti

मांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरस्वती तुकाराम शिनगारे यांची बिनविरोध निवड

सांगोला :
मांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरस्वती तुकाराम शिनगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच कौशल्याताई कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बुधवार दि. 6 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत सरस्वती शिनगारे यांचा एकमेव अर्ज झाल्याने सदरची निवड ही बिनविरोध झाल्याचे निवडीचे अध्यक्ष तथा सरपंच मंगलताई मधुकर भुसे व ग्रामसेवक मंगेश पोरे यांनी जाहीर केले.
निवडीनंतर सरपंच मंगलताई भुसे , मा.उपसरपंच कौशल्याताई कांबळे व ग्रामपंचायत सदस्य यांनी नुतन उपसरपंच सरस्वती शिनगारे यांचा सत्कार केला व त्यांना उपसरपंच पदाचा पदभार दिला. या निवडीसाठी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शहनाज तांबोळी, रेणुका वरेकर ,नसीमा मुजावर, यांच्यासह माजी सरपंच सचिन शिनगारे ,डॉ.बाळकृष्ण जगताप, अनिल शिनगारे , अमित तांबोळी, राहुल शिनगारे ,उद्योगपती दीपक शिनगारे , शहाजी शिनगारे, विनायक कुलकर्णी , निसार मुजावर, दत्तात्रय भुसे, संभाजी कांबळे, पांडुरंग कांबळे ,रामदास शिनगारे, सोमनाथ शिनगारे , सचिन गंगथडे यांच्यासह आदी उपस्थित होते. उपसरपंच पदाच्या निवडीनंतर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करून, आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना मांजरी ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच मंगलताई भुसे व सर्व सदस्य यांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहु असे अभिवचन नूतन उपसरपंच सरस्वती तुकाराम शिनगारे यांनी दिले.मांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ. सरस्वती तुकाराम शिनगारे यांची बिनविरोध निवडणूक पार पडली. या निवडीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते मंडळींनी सहकार्याची भूमिका दाखवली. आणि एकोप्याने गावच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व राजकीय पक्षाचे व नेते मंडळी आणि पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार.
सौ. मंगल मधुकर भुसे
सरपंच, मांजरी ग्रामपंचायत मांजरी

Exit mobile version