सांगोला:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महूद ढाळेवाडी येथील शिवसेना (शिंदे गट) व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी गुरूवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने सांगोला तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.यावेळी राहुल मेटकरी,शंकर मेटकरी,शहाजी मेटकरी,विष्णू कोळेकर,मारुती मोरे,सुरेश लुबाळ,अतुल ढाळे,अंकुश तुकाराम मेटकरी यांच्यासह महूद ढाळेवाडी येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगोला तालुक्यातील महूद ढाळेवाडी येथील शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला व सध्याचे नेते यांना कंटाळून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा निरोप दिला व शेकाप पक्षात प्रवेश केला. यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले.
महूद ढाळेवाडी येथील शिवसेना (शिंदे गट ) पक्षाच्या व मा.आम. शहाजीबापू पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना महूद भागतून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.