बंदी असलेल्या पदावर नियुक्ती करून, शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये उखळले
मा. शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांची एस.आय.टी. चौकशीची मागणी
तुफान क्रांती नेटवर्क:
महाराष्ट्रात सर्वात मोठा महाघोटाळा शिक्षक भरती झालेला असून शासनाच्या तिजोरीतून बंदी असलेल्या पदावर बोगस नियुक्ती करून करोडो रुपये उखळण्यात आले असा गंभीर स्वरूपाचा आरोप माजी शिक्षक आमदार ना.गो गाणार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. सन 2012 पासून हा प्रकार सुरू असून आज अखेर हा प्रकार सुरू आहे असे त्याचे मत आहे.. दोन मे 2012 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शिक्षक नियुक्तीला बंदी टाकण्यात आली होती. परंतु याला न जुमानता महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शिक्षणाधिकारीसह, अनेक मोठी साखळी असल्याचे मत त्यांनी मांडले.
भ्रष्टाचार कसा घडला ?
– दोन मे 2012 पासून पहिली ते बारावी शिक्षक भरती बंदी परंतु संस्थाचालकांनी हजारो नियुक्त केल्या.
– प्रत्येक नियुक्ती मागे 25 ते 30 लाख रुपये घेऊन बेरोजगार युवकांना नियुक्ती देण्यात आल्या
– शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक नियुक्तीला पाच ते दहा लाख रुपये घेऊन मान्यता प्रधान केली.
– शिक्षण उपसंचालकांनी या मान्यतांना शालार्थ आयडी प्रधान केली.
यांनी पैसे उखळले:-
1) संस्थाचालक 2)शिक्षणाधिकारी
3) शिक्षण उपसंचालक
4) शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातील कर्मचारी
5) मंत्रालयातील अधिकारी
गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार
नागपूर जिल्ह्यातील सोमेश्वर नेताम (प्राथमिक व माध्यमिक) ते मरण पावल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्वाक्षरीचे मान्यता आदेश निर्गमित करण्यात आले.
.आदेश- बॅक डेटेडअसतात
.नियुक्ती -बॅक डेटड असते.
.थकबाकी- वेतनाची लाखो रुपयांची ,वेतन पथकामार्फत अदा केली जाते.
हा गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार नागपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
59 दोषी शिक्षणाधिकार्यावर अजूनही कारवाई नाही, सर्व फाइल्स पेंडिंग :-
– सन 2018 19 ला सर्व जास्त प्रकार झाले
– समोर आले
– चौकशी झाली
– दोषी ठरले
– – कोरोना येण्यापूर्वी हे प्रकरण जोरात उचलले गेले होते परंतु परंतु कोरोनामुळे सर्व प्रकरण दबली गेली.
स्थानिक पातळीवर नस्त्या(File) जाळण्याचा प्रकार गंभीर:-
– नसत्या नष्ट करण्याची कार्यप्रणाली शिक्षण विभागांमध्ये निर्माण केली गेली आहे.
– जेव्हा चौकशीसाठी अधिकारी येतात तेव्हा नसत्याच उपलब्ध नसतात त्यामुळे शेकडो नसत्या नष्ट किंवा जाळून टाकल्याचा संशय आहे.
अशाप्रकारे 2012 पासून “मी शिक्षक होईल “या आशेवर बसलेलं होतकरू डी.एड.बी.एड. धारकाच्या स्वप्नांवर कृहाड घालण्याचे काम झाले आहे. भ्रष्टाचारात मंत्रालय कनेक्शन कस आहे ? सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भूमिका, महाविकास आघाडी व महायुती दोन्ही काळात भ्रष्टाचार , शासनाच्या संरक्षणात भ्रष्टाचार कसा झाला ?आणि टीईटी व अभियोग्यता परीक्षेत सुद्धा महाघोटाळा झाला आहे..?