मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात सांगोला तालुका अग्रेसर राहिल यासाठी प्रशासनाने चोख नियोजन करावे- डॉ.अनिकेत देशमुख 

सांगोला/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, आदी प्रक्रियेत पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या. महिलांची अडवणूक, दिरंगाई करून पैसे घेतल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करावी.अशी विंनती करत योजनेच्या अंमलबजावणीत सोलापुर जिल्ह्यात सांगोला तालुका अग्रेसर राहिल यासाठी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करावे, असे विनंती शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे.योजनेसाठी नावनोंदणी, अर्जासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविली आहे. सांगोला तालुक्यातील जास्तीतजास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, नोंदणीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, छाननी करणे व ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे,अशी विनंतीही डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
सांगोला तालुक्यातील सर्व गावातील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची परिपुर्ण माहिती मिळावी तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला ग्रामसभा लागणे गरजेचे आहे.ग्रामसभेमधून महिलांना परिपूर्ण माहिती मिळेल व जास्तीत जास्त ऑनलाईन फॉर्म भरून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ सर्व घटकांतील महिलांना मिळेल यासाठी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना आवाहन करावे.
-डॉ.अनिकेत देशमुख
ALSO READ  शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000