सांगोला (तालुका प्रतिनिधी):
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी – कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला आहे. सोमवार ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सांगोल्यात कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, स्टेशन मास्तर गंगाकुमार सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला.
कलबुर्गी – कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र, या रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने सांगोल्यासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून कलबुर्गी – कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी कलबुर्गी – कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त निदर्शक विवेककुमार सिन्हा यांनी कलबुर्गी – कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांब्याला मंजुरी दिली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.
त्यानुसार सोमवार ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सांगोल्यात कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, (ADI पंढरपूर ) जानार्धन प्रसाद, (TI पंढरपूर ) अशोक श्रीवास्तव, स्टेशन मास्तर गंगाकुमार सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, संभाजी आलदर, शिवाजी गायकवाड, नवनाथ पवार, विजय बाबर, बाळासाहेब आसबे, पप्पू पाटील,वसंत सुपेकर,दिलीप सावंत, विलास होनमाने, नीलकंठ शिंदे, दीपक चोथे, मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, बंडू केदार, सोयजीत केदार, संजय केदार,यांच्यासह आपुलकी प्रतिष्ठान सदस्य, शहीद अशोक कामटे संघटनेचे सदस्य, शहीद जवान बहुउद्देशिय संघटनेचे सदस्य, प्रवाशी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेकांनी पंढरपूर ते मुंबई गाडी सातही दिवस सुरू करावी तसेच ती गाडी सांगोला येथून सुरू करावी अशी मागणी केली.