Site icon Tufan Kranti

फासेपारधी महिलेचा छातीत भाला भोसकून खून :लिंगनूर कापशी जवळील घटना

फासेपारधी महिलेचा छातीत भाला भोसकून खून :लिंगनूर कापशी जवळील घटना
तुफान क्रांती मुरगूड प्रतिनिधी
      कागल तालुक्यातील कर्नाटक सिमेवरील लिंगणूर कापशीच्या सीमेवर एका फासेपारधी महिलेचा छातीत भाला भोकसून खून केला. येवनबाई शिक्षण भोसले (वय 35 वर्षे) रा. लखनवाडा, ता. खमगाव, जि. बुलढाणा असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मयत महिलेचा पती शिक्षण भोसले याच्या अनैतिक वर्तनातून हा खुन अमरावतीच्या दुसऱ्या फासेपारधी टोळीने केल्याचे समजते. पती शिक्षण भोसले यांना मारण्यासाठी आलेल्या लोकांना अडवत असताना येवनाबाईच्या छातीत भाला बसून तिला शक्कर शक्राप्पा पवार (वय २२ वर्षे) यांने ठार केले. तारासन पुंड्या काळे, कुटरुक आदमास पवार, टायटन आदमास पवार रा. अंजनगाव जि. अमरावती
 हे अन्य तिघेही सहभागी होते. असे फिर्याद नोंदवताना शिक्षण भोसले यांने पोलिसांना सांगितले. ही घटना सायंकाळी ६. ३० वा.च्या सुमारास घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलिसात करण्यात आली
Exit mobile version