डॉ-अनिकेत देशमुख यांचा त्याग पाहता त्यांना पक्ष त्यांना वार्यावर सोडणार नाही-भाई जयंत पाटील
दै.तुफान क्रांती सांगोला:
सांगोला विधान सभा हा शेकापचा बालेकिल्ला असताना एथील जनता आता सुज्ञ आहे. चालू राजकीय घडामोडी पाहता सर्वसामान्य, गोरगरीब, कष्ठ्करी, वंचित घटक जो पर्यंत लाल लाल बावट्याच्या पाठीशी आहे तोपर्यंत तालुक्यातून लाल बावटा उतरू शकत नाही. आज होऊ घातलेल्या विधान सभेच्या शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला येथील उमेदवार बाबासाहेब देशमुख असतील असे जाहीर केले. सध्याचे राजकारण पाहता सध्याचे सरकार हे आजपर्यंतच्या इतिहासाथिल सर्वात वाईट सरकार असल्याचे सांगत झाडी, डोंगार, हाटीलचा आनंद घेण्यासाठी प्रस्थापितांना अलिबागला पाठवा असे आव्हान भाई जयंत पाटील यांनी केले. असे असतान अनिकेत देशमुख यांचा त्याग आपला शेकाप कदापि विसरणार नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर रतनबाई गणपतराव देशमुख, शोभाताई पाटील,डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, मारुती आबा बनकर, बाळासाहेब एरंडे, दादाशेठ बाबर, प्रा.विठ्ठलराव शिंदे. चिटणीस बनकर, माजी उपनगराध्यक्ष पप्पू धनावाजीर यांच्यासह आजी माजी सरपंच,सोसायटी चेअरमन, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.