इंदापूर येथे रंगणार भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडी उत्सवाचा थरार !

दै. तुफान क्रांती/इंदापूर:

डोळ्यांचे पारणे फेडणारा,क्षणा, क्षणाला उत्कंठा वाढवणारा आणि इंदापूर करांचे खास आकर्षण असलेल्या भरतशेठ शहा मित्र परिवार दहिहंडी महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता इंदापूर पोलीस स्टेशन समोरील जुन्या मार्केट कमिटीच्या मैदानावरती करण्यात आले आहे. इंदापूर मधील भरत शहा यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारा हा दहिहंडी महोत्सव, सर्वात जास्त गर्दी होणारा इंदापूर तालुक्यातील दहिहंडी महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या दहीहंडी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यात विजेत्या संघाला ५१ हजार रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

दरवर्षी थरांचे विक्रम करणारा दहिहंडी महोत्सव म्हणून ही शरत शहा मित्र परिवार हा दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे. सुसज्य ढोलपथक, उत्कृष्ट डॉल्बी साउंड यंत्रणा, राज्यभरातून येणारे गोविंदा पथक यासाठी हा दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री मानसी नाईक यांच्या भारदार नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.त्याचबरोबर रशियन कलाकारांचा विशेष नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये प्रत्येक सहभागी गोविंदा पथकास ११००० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी प्रमुख उपस्थिती कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित (दादा)
पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी या दहिहंडीला उपस्थित राहुन, गोपालांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजक भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ALSO READ  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे योगदान अविस्मरणीय -दिपकआबा साळुंखे पाटील 

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000