इंदापूर महाविद्यालयात आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन.

दैनिक तुफान क्रांती. 
इंदापूर:
    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटी मार्केट(NISM ), सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया( SEBI ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ फेब्रुवारी आणि ८ फेब्रुवारी रोजी इंदापूर महाविद्यालयामध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबत ची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर यांनी दिली.
   माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले ,संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सेबीचे प्रशिक्षक डॉ. विजयकुमार ककडे आणि डॉ. सुवर्णा सूर्यवंशी हे या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
   या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. तानाजी कसबे आणि सह समन्वयक प्रा. श्याम सातार्ले यांनी केले.
ALSO READ  बाळापूर नाव सोलापूर मध्ये सुमित संजय बंटी पाटील याची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत निवड 2024

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000