भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या कौन्सिलवर हर्षवर्धन पाटील यांची निवड.

दैनिक तुफान क्रांती. 
इंदापूर 🙁 दि.३ फेब्रुवारी )
 भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची सदस्यपदी  निवड झाली आहे. या संबंधी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने शुक्रवारी (दि.२ फेब्रु.२४) प्रसिद्ध केली. देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
               राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशभर पुणे सह १८ विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज केले जात आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड केलेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
          राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत  सहकारी तत्वावर कृषी उत्पादने, अन्नपदार्थ, औद्योगिक वस्तू, पशुधन आणि उत्पादने यांच्यावर प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आणि आयात  करणे तसेच रुग्णालय, आरोग्यसेवा आणि शिक्षणातील काही उत्पादने आणि सेवा यांचे नियोजन करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी काम केले जात आह. तसेच देशातील विविध प्रकारच्या सहकारी संस्था, साखर उद्योग यांना सहाय्य करणे आणि त्यांच्या आर्थिक पायाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय विकास महामंडळ  (एन.सी.डी.सी.) केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे नेतृत्वाखाली  प्रभावीपणे काम करीत आहे. माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे या निवडीबद्दल विविध स्तरातून स्वागत होत आहे.
ALSO READ  तालुक्यातील 24 गावामध्ये महिला सभागृह उभारणीसाठी 4 कोटी 70 लाख रुपयांच्या भरीव निधीस मंजूरी : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000