दै.तुफान क्रांती/ इंदापूर:
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) शुक्रवारी (दि.१८) नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येत आहे, असे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना शुक्रवारी दि.१८ पत्राद्वारे कळविले आहे. पक्षाची संसदीय मंडळाची बैठक मुंबईत शनिवारी दि.१९ होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळावर निवड केल्याने इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.