तुफान क्रांती मुरगूड:
मुरगूड ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत , डॉक्टरांची वाणवा ‘ कर्मचारी अपुरे , रुग्णवाहिका नादुरुस्त या सावळा गोंधळामूळे रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत याबद्दल नागरिकातून संताप पसरला आहे यासंदर्भात युवक संघटनांनी वैद्यकिय अधिक्षकांना घेराव घालून धारेवर धरले व जाब विचारला रुग्णालयात योग्य त्या सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे .
या भागातील सामान्य रुग्णांचे आरोग्याची काळजी घेणाऱ्या मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा ढासळत चालली आहे . येथे २४ तास डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे . दोन कंत्राटी डॉक्टरांवर रुग्णांना विसंबून रहावे लागते . त्यांच्याही कामात वारंवार हलगर्जीपणा होत आहे तर या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक हे पूर्णवेळ हजर नसतात त्यांचे येथील आरोग्य सेवेकडे अक्षम्य दुर्लक्षामूळे येथील आरोग्य सेवा ढिसाळ झाली आहे .
याच परिणामातून येथील एका ३२ वर्षीय युवक सुशांत महाजन यांचा मृत्यू झाला . याला येथील प्रशासन ‘ सुविधांचा अभाव व १o८ अँम्ब्युलन्स सेवा नादुरुस्त असल्याने रुणांना बाहेर नेताना क्रिटीकल रुग्ण दगावतात अशाच युवक सुशांत महाजन याच्या मृत्यूस जबाबदार असल्याबद्दल संबधित युवकाच्या नातेवाईकांनी वैद्यकिय अधिक्षक बी डी .डवरी यांना धारेवर धरले त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली . असे अन्य कोणाचा बळी जावू नये यासाठी येथील डॉक्टर सहीत आरोग्य सेवा सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक संघटनांनी दिला आहे .
आरोग्य सेवा देणारा कर्मचारी वर्ग अपुरा आहे . कालबाहय झालेली औषधे वापरली जातात . सोनोग्राफी ‘ एमआरआय ची सोय नाही . स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नसल्याने प्रसुती महिलांना बाहेरच्या खाजगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागतो . अशा एक ना अनेक गैरसोयीचा अनुभव रुग्णांना येतो .इर्मजन्सी रुग्णाला वेळेत सेवा मिळत नाही .
सामान्य रुग्णांना आरोग्य सेवा देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळतात . ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक पंधरा वीस किलोमीटर अंतरावरुन येतात पण नियमित येत नाहीत . त्यांचे येथील आरोग्य प्रशासनावर लक्ष नाही . त्यामूळे ढिसाळपणा आला आहे याकडे ना शासनाचे लक्ष ना आरोग्य विभागाचे लक्ष येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत सापडला आहे .