Site icon Tufan Kranti

प्रसूती बाबत खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला नको-आरोग्य अधिकारी डॉ राखी माने

सोलापूर:
 सिझेरियन व नैसर्गिक प्रसूती अशा दोन्ही सेवा महापालिकेच्या प्रसूतिगृहात दिली पाहिजे. त्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा उपलब्ध करण्यात येईल, प्रसंगी स्वतः सिझेरीयन प्रसूतीसाठी उपस्थित राहीन. कोणत्याही परिस्थितीत गरोदर मातांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊ नका, अशा सक्त सूचना महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सर्व डॉक्टर व परिचारिकांना दिले.
महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रांना भेटी देण्याचा धडाका आरोग्य अधिकाऱ्यांनी लावला आहे त्यामुळे आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली असून त्यास शिस्त लागत आहे.आठ पैकी सहा प्रसूतीग्रहाना भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली त्याचा परिणाम शुक्रवारी त्यांनी भावनाऋषीं प्रसूतीग्रहास त्यांना स्वच्छता दिसून आली. महापालिका प्रसूतीगृहे सेवा देण्यासाठी आहेत त्या ठिकाणी गरोदर महिलांची आवश्यक ती काळजी घेतलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत हेळसांड होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी डॉक्टर्स व परिचारिकांनी घेतली पाहिजे अश्या सूचना देखील आरोग्य अधिकारी राखी माने यांनी दिल्या.
 आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांची ‘भावनाऋषी हॉस्पिटल ‘ला भेट
महापालिकेच्या भावना ऋषी दवाखान्यातील क्षयरोग विभागातील सुपरवायझर व एक आया यांना कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई का करू नये, यासाठी नोटीस बजावण्याचा येत आहे. महापालिका आरोग्य विभागातील संबंधित सर्व डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळ व शिस्त पाळणे आवश्यक आहे.
Exit mobile version