डॉ.अनिकेत देशमुख यांची सांगोला येथील दिव्यांग तपासणी शिबिरास भेट
सांगोला:
दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिर सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर येथे संपन्न झाले.दिव्यांग व्यक्तीकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला सांगोला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काल बुधवार दि.4 सप्टेंबर रोजी शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी या शिबीरास भेट देवून कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हि जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिबिराच्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबरोबरच या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अन्य सर्व शासकीय योजनांची माहिती प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला अत्यंत व्यवस्थितपणे समजावून सांगावी अशी विनंती करत शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा यांनी काळजी घ्यावी तसेच शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजना चा लाभ दिव्यांगाना देण्यासाठी संबंधित विभागाचे माहिती स्टॉल लावण्यात आलेले होते. त्यांचीही माहिती डॉ.अनिकेत देशमुख यांनी जाणून घेतली.याप्रसंगी त्यांनी अनेक दिव्यांग बांधवांची आपुलकीने चौकशी करुन अडचणी जाणून घेतल्या.
शिबिराचे योग्य नियोजन केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानून अशी शिबिरे दरवर्षी राबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. याचप्रमाणे ज्या दिव्यांग बांधवांचे तांत्रिक काही अडचणींमुळे तपासणी होऊ शकली नाही अशा दिव्यांग बांधवांसाठी प्रशासनाने लवकरात लवकर शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी करावी अशी ही मागणी डॉ.अनिकेत देशमुख यांनी यावेळी केली
आबासाहेबांचा नातू आलाय..
डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानातंर्गत दिव्यांग तपासणी शिबिर भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक दिव्यांग बांधवांची आपुलकीने चौकशी केली. शिबीराप्रसंगी आबासाहेबांचा नातू भेटायला आलाय हे समजल्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहर्यांवर आनंद दिसून आला. अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी समस्या डॉ.देशमुख यांना सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉ.अनिकेत देशमुख यांनीही सर्व समस्या ऐकून घेत सर्व समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.