धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाजबांधवांच्या पाठीशी उभा राहणार- डॉ.अनिकेत देशमुख

तुफान क्रांती/पंढरपूर:
 आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यावर म्हणजेच रस्त्यावरची लढाई, सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकतीने लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल. उपोषणकर्त्यांना  मी आपल्यासोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाजबांधवांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहणार आहे.शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ अनिकेत देशमुख यांनी केली.मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अनेकदा उपोषण केलं जातं. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं. असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे धनगर  बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणास गुरुवारी (दि.१२ )रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेत उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.यावेळी डॉ. अनिकेत देशमुख बोलत होते.
मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे, तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले आहेत.मात्र या लढ्याला अद्यापही यश आले नाही.  राज्य सरकारने धनगर समाजाचे पालकत्व स्वीकारून सनदशीर पद्धतीने चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा.जर  राज्य सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर त्याचे परिणाम नजीकच्या कालावधीत दिसून येथील असा इशारा डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिला
ALSO READ  आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विधानसभेतील पहिल्याच भाषणाने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000