व्हनाळी : सागर लोहार
जाता पंढरीशी सुख वाटे जीवा… असे म्हणत साके ता.कागल येथील वारकरी गेली 21 वर्षे सातत्याने पायी दिंडीने पंढरीला जात आहेत. येथील श्री विठ्ठल रूक्मीनी वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थ सेवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. मुखी हरिणाम आणि टाळ मृदंगाचा अखंड गजर करीत थंडी,उन वा-याची तमा न बाळगता पांडूरंगाच्या दर्शनासाठी वैकुंठवाशी श्री गुरू ज्ञानेश्वर माऊली सोपानकाका देहूकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.महादेव पाटील सांगावकर यांच्या प्रेरणेने माघ वारीसाठी ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ च्या जयघोषात दिंडीचालक ह.भ.प. माजी उपसरपंच डॅा. हिंदूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही रविवार (ता.11) रोजी साके ते पंढरपूर पायी दिंडी माघवारीनिमित्त विठ्ठलाच्या देवदर्शनासाठी पंढरपुरला मार्गस्थ झाली.
पहाटे काकडाआरती, विठ्ठल रूक्माई,विना – तुळस पुजन डॅा.हिंदूराव पाटील,सैा.छाया पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यंदा पायी दिंडीचे 22 वे वर्षे आहे. रविवार दिं 11 फेब्रुवारी 2024 ते रविवार दि,19 फेब्रुवारी 2024 पर्यंत सलग 7 दिवस पायी दिंडी साके,पंट्टणकडोली,जयसिंगपुर,भोसेफाटा, कुची,जुनोनी,कमलापूर,खर्डी या मार्गावरून दिंडी पंढरपुर मुक्कामी विठ्ठल दर्शनासाठी पोहचणार आहे. दिंडी संयोजक बाळासो पाटील,गणपती पाटील,पांडूरंग पाटील,संदिप पाटील, शरद पाटील,मच्छिंद्र पाटील,समित घराळ,संतोष गवसे,राजू कुळवमोडे,अमोल निऊंगरे,बाळासो पाटील-गलगले,अमर पाटील संदिप खराडे,विश्वास पाटील अजित निऊंगरे यांनी केले. विणेकरी ह.भ.प तुकाराम बाळकू पाटील,सौ.संपदा पाटील,सरपंच सुशिला पोवार काकडा व हरिपाठ धनाजी जाधव,साताप्पा पाटील,मृदंग साथ समाधान कोराणे व हरिपाठ मंडळ साके यांचा सहभाग आहे.