Site icon Tufan Kranti

धायटी येथील शिवसेना (शिंदे गट) पक्षाने फसवून घेतलेल्या कार्यकर्त्यांची शेकाप पक्षात घरवापसी

सांगोला:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धायटी येथील शिवसेना (शिंदे गट) गटामध्ये फसवणूक करून प्रवेश करून घेतलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची घरवापसी करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षात घरवापसी केली.
डॉ. बाबासाहेब देशमुख व डॅा.अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला.यावेळी यावेळी संजय कृष्णा कोळेकर, विकास देवकाते, गोवर्धन तांबे, शहाजी देवकाते यांच्यासह धायटी येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख आणि डॅा.अनिकेत देशमुख यांनी स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना धायटी भागतून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version