मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे विकासाचे व्हिजन असणारे लोकाभिमुख नेतृत्व-चेतनसिंह केदार सावंत

जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, मिठाईने वाढवला गोडवा

सांगोला:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात पुनश्च विकासपर्व सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्यामुळे, आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात विकासासह रस्ते, रेल्वे आणि मेट्रोचे जाळे विस्तारले आहे. महाराष्ट्रात अनेक विकासाभिमुख प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली, त्यांची सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांसारखे दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व विकसित महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नव्या उंचीवर घेऊन जाईल, यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस म्हणजे कार्यकर्त्यांना आधार देणारा लोकाभिमुख नेता आणि विकासाचे व्हिजन असणारे लोकाभिमुख नेतृत्व होय अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने या शपथविधी सोहळ्याची सुरुवात होताच, सांगोला तालुक्यासह माळशिरस, करमाळा , माढा, बार्शी तालुक्यातील चौकाचौकात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी रस्त्याने जाणारा प्रत्येक जण थांबला.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे स्क्रीन उभारून प्रक्षेपणही करण्यात आहे.
सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी लाइव्ह स्क्रीनवर दाखविण्यात आला. परिसरातील नागरिकांनी तसेच भाजप कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर जोरदार आतषबाजी करण्यात आली. चौकाचौकात ढोल-ताशांचा गजर सुरू होता अन् दुसरीकडे शपथविधी सोहळा स्क्रीनवर पाहताना सगळे आनंदून गेले होते. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे, जिलेबी वाटत ढोलताश्यांवर जल्लोष साजरा करीत देवेंद्र पर्वाचे स्वागत केले. देवाभाऊ, देवाभाऊ आपला लाडका देवाभाऊ, भारत माता की जय अशा घोषणा देत आनंद साजरा केला. ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मिठाई वाटून जल्लोष केला. उत्साही कार्यकर्त्यांनी यावेळी हातात भाजपचे झेंडे घेत हवेत फिरवून वातावरण बदलून टाकले. गुलालाची उधळण करुन आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आंनद जल्लोष केला

ALSO READ  हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000