देगलूर ( प्रतिनिधी):**युवा ग्रामीण पत्रकार संघ देगलूर तालुका अध्यक्षपदी अमोल कुमार शिंदे यांची निवड करण्यात आली.
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या अध्यक्षते खाली देगलूर तालुका नूतन 2024 ची कार्यकारणीची बैठक पार पडली.
नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह देगलूर येथे तालुका कार्यकारणीची घोषणा यांनी यावेळी जाहीर केले. सदरील कार्यकारणी पुढीलप्रमाणे नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी ईश्वर देशमुख, देगलूर तालुका अध्यक्षपदी अमोल कुमार शिंदे, देगलूर तालुका सचिव पदी प्रसंगीत कांबळे, देगलूर तालुका उपाध्यक्षपदी संघपाल मदने यांच्या निवडी जाहीर करण्यात आले आहे. या बैठकीदरम्यान नूतन युवा ग्रामीण पत्रकार संघ देगलूर तालुका सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार म्हणाले की आपल्या संघटनेची बांधणी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात सुरू आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवाचे तसेच गोरगरीब व अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रकारांच्या समस्या लक्षात घेऊन पत्रकार संघाची गरज नमूद केली तसेच पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा सांगत पत्रकारांना संघटित होण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वध्देवार, पत्रकार रुपेश पाटील, पत्रकार संतोष मान धरणे, पत्रकार मारुती, संभाजी ब्रिगेडचे जेजेराव पाटील, नारायण पाटील वडजे, पत्रकार मल्लिकार्जुन कडलवार, पत्रकार प्रमोद मोरे, पत्रकार ज्ञानोबा सुरनर, पत्रकार सुभाष वाघमारे किनीकर तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.