एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात इंदापूर पोलिसांना यश.

दैनिक तुफान क्रांती.
इंदापूर: (३० जुलै )

इंदापूर पोलिसांना गेल्या एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या एका आरोपीच्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने पकडून मुसक्या आवळल्या आहेत. सागर उर्फ चिकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) या आरोपीस इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नं. ६८४/२०२३ भा.द.वी कलम ३०७,३२४, ५०४, ५०६, ॲट्रॉसिटी ३(१), ३(२) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी चिकास देवकर हा दि. २९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास काटी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाल्याने इंदापूर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शक सूचना दिल्या. सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाने काटी गावामध्ये सापळा रचून सदर आरोपीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी सर्वश्री पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), संजय जाधव (अप्पर पोलीस अधीक्षक), डॉ. सुदर्शन राठोड ( विभागीय पोलीस अधिकारी बारामती) , सूर्यकांत कोकणे (वरीष्ठ पोलीस निरीक्षक,इंदापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, सहा. फौ. प्रकाश माने, पो.कॉ.गणेश डेरे, पो.कॉ. विशाल चौधर यांनी कामगिरी पार पाडली.

ALSO READ  अपघाताचा बनाव करून खून करण्याचा प्रयत्न, पाच लाखांची दिली होती सुपारी. पोलिसांच्या तपासात आले सत्य समोर

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000