अपघाताचा बनाव करून खून करण्याचा प्रयत्न, पाच लाखांची दिली होती सुपारी. पोलिसांच्या तपासात आले सत्य समोर

तुफान क्रांती/दौंड: सुमित रणधीर
दौंड तालुक्यातील पाटस कानगाव रोडवर दि १७ऑक्टोबर रोजी रात्री १०:४५ वाजे सुमारास. पाटस बाजुकडुन कानगाव बाजुकडे फिर्यादी वैभव दिवेकर हे हिरो होंडा सी.डी. डिलक्स मोटार सायकल नं.एम.एच.४२ सी. ९८४३ या वरून घरी जात असताना अपघाताची घटना घडली होती. यामध्ये ग्रे रंगाची हुंडाई कंपनीची वेनू मॉडेल नंबर नसलेली चार चाकी कार या वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात कानगाव बाजुकडे जात असताना फिर्यादी यांचे मोटार सायकलला पाठीमागुन जोरदार धडक देऊन वाहन चालक पळुन गेला असल्याने पाटस पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघाताचे अनुषंगाने घटनास्थळी पंचनामा केला असता व अपघातग्रस्त वाहनांची परीस्थीती पाहता सदर अपघात नसून हा घातपात असल्याची दाट शक्यता वाटत असल्याने पाटस पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांनी वरीष्ठांना सदर घटनेची माहिती कळवुन वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्रिंक विश्लेषन व सी.सी.टी.व्ही. तपासणी केली. तसेच गोपनीय बातमीदार मार्फत माहीती घेवुन अपघाताची सखोल चौकशी केली असता सदरचा प्रकार हा अपघात नसुन अपघाताचा बनाव कट रचुन खुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. या मध्ये संशयीत आरोपी १)अक्षय गोपीनाथ चव्हाण वय-२७ वर्षे सध्या रा.पाटस ता. दौंड जि.पुणे मुळ रा.खेड ता.कर्जत जि. अहमदनगर याला ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता. त्याने सांगितले कि जखमी वैभव दिवेकर रा.पाटस ता.दौंड जि.पुणे यास चार चाकी गाडीने ठोस देवुन जीवे ठार मारण्यासाठी २) अक्षय बबन कोळेकर, रा.पाटस ता. दौंड जि. पुणे. याने मला तसेच ३)तुषार चोरमले, ४)सुरज विजय पवार. रा.पाटस ता.दौड जि. पुणे, ५)लाला पाटील. रा.भिगवण ता. इंदापुर जि.पुणे असे चौघांना ५ लाखाची सुपारी दिली असल्याचे कबुल केले आहे. अशी माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख पुणे ग्रा,अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस दौंड विभाग, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख, पासेई वागज, पोहवा गुरुनाथ गायकवाड, सहा. फौजदार महेंद्र फणसे, सहा. फौजदार अनिल ओमासे, सहा. फौजदार भानुदास बंडगर, पोहवा.हिरालाल खोमणे, पोहवा. अक्षय यादव, पोहवा. संदीप देवकर, पोहवा. महेंद्र चांदणे, पोहवा. विकास कापरे, पोहवा. रामदास जगताप, पोहवा.कानिफनाथ पानसरे, पोकॉ.मारूती बाराते, पोकॉ.गणेश मुटेकर यांनी केली असुन यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले असुन ते सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख हे करीत आहेत.

ALSO READ  डॉ.एन.जी.मिर्झा रामबाण इलाजाचे आरोग्यदूत

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000