Site icon Tufan Kranti

सणसर येथे शनिवारी तर बावडा येथे रविवारी भाजपचा मेळावा

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणाकडे लक्ष
दैनिक तुफान क्रांती:
इंदापूर 🙁 दि.७ मार्च)
 भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सणसर-लासुर्णे गटाचा शनिवारी (दि.९) सायंकाळी ६ वा. तर बावडा येथे बावडा-लाखेवाडी गटाचा रविवारी (दि.१०) सायंकाळी ६ वा. भाजपचा विजय संकल्प मेळावा २०२४ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
          “संकल्प 2024 संकल्प विजयाचा” या अभियानांतर्गत सणसर येथील मेळावा पालखी मैदानावरती तर बावडा येथील मेळावा श्री शिवाजी विद्यालयामध्ये संपन्न होणार आहे. लोकसभा निवडणुका आठवडाभरामध्ये जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशात सलग 3 ऱ्या वेळी सत्तेवर आणणेसाठी भाजप कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत.  भाजपचे कार्यकर्ते आगामी निवडणुकांसाठी ॲक्शन मोडवर आले आहेत. त्या दृष्टीने या मेळाव्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील हे भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व कार्यकर्ते, बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले आहे.
Exit mobile version