शिरभावी येथे शेकापची कॉर्नरसभा संपन्न; संविधान देऊन देशमुख बंधूचे स्वागत
सांगोला:
रात्रदिवस घाम गाळून, काबाडकष्ट कष्ट करुन बळीराजा जगाचा पोशिंदा बनला आहे. त्याच बळीराजाला भिकार्याची उपमा देता, लाज वाटली पाहिजे तालुक्यातील बोलणार्यांना. रात्रदिवस घाम गाळणार्या बळीराजाला भिकार्याची उपमा देता.त्यामुळे येणार्या काळात बळीराजाच तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवेल असे सांगत स्व.आबासाहेबांनी ज्या बळीराजास केंद्रबिंदू ठेवून समाजकारण केले, तोच बळीराजा आमच्यासाठी सर्वकाही असून शेतकरी कामगार पक्ष बळीराजाचा अवमान कदापीही सहन करणार नसल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शिरभावी, धायटी, चिंचोली येथे भव्य कॉर्नरसभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर डॉ.अनिकेत देशमुख, मा.सभापती बाळासाहेब काटकर, डॉ.सुदर्शन घेरडे, प्रदिप मिसाळ, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह मित्रपक्षाचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोला मतदारसंघात अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. गेल्या 5 वर्षात सत्ता असूनही यांना पाणी तसेच रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही.सांगोला तालुक्याचा विकास करायचा आहे. म्हणून शेकापला मतदान करणे गरजेेच आहे.सांगोला मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून हा मतदार संघ विकसीत करण्यासाठी आणि येथील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिरभावी येथील मायाप्पा व्होवाळ यांनी संविधान वाचविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षच गरजेचा आहे. स्व.आबासाहेबांनी पुरोगामी विचार टिकवून सर्वसामान्यांना न्याय दिला. शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी विचाराचे राजकारण करुन चळवळ जिंवत ठेवली.त्याच विचाराला व चळवळीला आम्ही आता साथ देणार असून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिरभावी येथील आनंद व्होवाळ यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यानी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. सर्वांचे स्वागत डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी करुन सर्वांचा मान सन्मान राखला जाईल, आपला विश्वास तडा जाऊ दिला जाणार नाही असे सांगितले.