अपघाग्रस्त व्यक्तीची मदत करताना सहायक पोलिस निरीक्षक यांचा अपघाती मृत्यू

सोलापुर :
 अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डाेक्याला  मार लागून गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार झाले.
सांगोला-पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमालानजीक शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली.कपिल विठ्ठल सोनकांबळे (वय ४२, सध्या पंढरपूर, मूळचे नांदेड) असे मृत सहायक पोलिस निरीक्षकांचे नाव आहे.  या  अपघाताची माहिती कळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक भीमराव खणदाळ यांनीा खासगी रुग्णालयात भेट देऊन अपघाताची चौकशी करून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
सांगोला पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कपिल सोनकांबळे हे स्वतःच्या बुलेटवरून पंढरपूरला घराकडे निघाले होते. वाटेत पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमालानजीक अज्ञात वाहनाने सायकलस्वारास धडक दिल्यामुळे वृद्ध इसम जखमी अवस्थेत रोडवर पडले होते. हे पाहून कपिल सोनकांबळे यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून डोक्याचे हेल्मेट काढले व जखमीला मदत करण्यासाठी जात होते. नेमके त्यावेळी सांगोल्यांकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर मार लागला.अपघाताची माहिती कळताच पोलीस नाईक राहुल कोरे, आप्पा पवार, मोहसीन सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपचाराकरता सरकारी वाहनाने तत्काळ सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
ALSO READ  घरकुल योजनेत हेराफेरी निगडे ग्रामपंचायतीमधील प्रकार उघड

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000