सांगोला येथे लाच स्वीकारताना खाजगी इसम व पोलिस ए.सी.बी.च्या जाळ्यात

सांगोला :
 दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी 45 हजार रुपये मागून तडजोडी करून 25 हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाई सह खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली आहे. पोशि सोमनाथ माने, ब.नं. 2036, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. यातील तक्रारदार यांचे व त्यांचे मुलांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे येथे दखल असलेल्या गुन्हयात कलम वाढ न करुन अटक न करता जामीनवर सोडण्यासाठी व गुन्हयाचे तपासामध्ये मदत करणेसाठी पोका / सोमनाथ माने, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम यांनी प्रथम 45000 रुपये लाचेची मागणी केली होती अशी तक्रार प्राप्त झाली.
 22/07/2024 रोजी पडताळणी कारवाईमध्ये प्रथम 30,000 रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 25000 रुपये लाच रक्कम पोशि सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याचे तयार दर्शवुन सदरची 25000 रूपये लाचेची रक्कम खाजगी इसम यांच्या हस्ते स्वीकारले असल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक पुणेचे पोलीस अधिक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक श्री. गणेश कुंभार, पोलीस अंमलदार सपोफौ कोळी, पोह सोनवणे, पोशि किणगी, चापोह गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
ALSO READ  सांगोला मध्ये अंगावर शहारे उभारणार असा शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान शिवशिल्प लोकार्पण सोहळा अनेक मान्यवर उपस्थित

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000