Site icon Tufan Kranti

अवताडे कंट्रक्शनच्या मालकावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा – मविसेची मागणी

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरणजी साठे साहेब यांच्या आदेशाने पुणे पंढरपूर महामार्गावरील वेळापूर हद्दीतील रस्त्यावर असलेल्या ठाकूरबुवा येथे अकलूज येथील संजय खंडागळे व राजू मोरे यांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला,अवताडे कंट्रक्शनने रस्त्याचे काम चालू असताना वाहनांना वळण्यासाठी दिशादर्शक फलक लावले नसल्याने व त्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे,सदरील प्रकरणात रस्ते वाहतूक नियमांचा भंग झाले असल्याने याची सर्वस्व जबाबदारी अवताडे कंट्रक्शनने स्वीकारावी,झालेल्या हलगर्जीपणामुळे सदरील अपघात घडून आला आहे,तरी या अपघाताला मुख्य दोषी धरून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मयताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत करण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन मा प्रांत अधिकारी अकलूज व डी वाय एस पी यांना निवेदन देण्यात आले आहे,यावेळी राज्यसचिव अनिल साठे,राज्य समन्वयक अजितदादा साठे,अकलूज शहर संघटक किरण खंडागळे,राहुल गायकवाड आदी उपस्थित होते…!

Exit mobile version