शिरूरमध्ये शिवसेना-ठाकरेंना मोठा धक्का, ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, बांधकाम विभाग-पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांचा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ALSO READ  भरतशेठ शहा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार !

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000