योग्यवेळी योग्य तो
उठवावा योग्य मुद्दा
रे नाजूकजागेवरती
जोरात मारावा गुद्दा
निर्णायक निर्णयाने
शोभून दिसतो हुद्दा
मोठ्याला लोळवतो
छोटा पैलवान सुध्दा
आशीर्वाद मोलकळे
सन्मान करता वृध्दा
आत्मसन्मान जागृत
आवडे आबाल वृद्धा
चर्चा करे सामंजस्ये
खुले मार्ग प्रतिबध्दा
उदार दानाचे महत्व
कळेलं ना अतिबध्दा
गर्वांने पीडित वेदना
शाल्व प्रौड्रक उन्नदा
महत्व कुठले श्रमाचे
कळेन अयत्नसिध्दा
नकोकाही शिफारस
प्रकाशमान प्रसिध्दां
आत्मिकसुख मिळवे
पोहता प्रवाह विरुद्धा
भल्याकार्यात आडवे
तयार असे अवरुद्धा
उद्दिष्ट साध्य सिध्दता
काय सांगावे निर्बुद्धा
मळभ होई भयभीत
पाहता चित्त विशुध्दा
मार्ग करतोय मार्गस्थ
वाटसरुस धारेशुध्दा
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..