Site icon Tufan Kranti

धारेशुध्द

योग्यवेळी योग्य तो
उठवावा योग्य मुद्दा
रे नाजूकजागेवरती
जोरात मारावा गुद्दा
निर्णायक  निर्णयाने
शोभून दिसतो  हुद्दा
मोठ्याला लोळवतो
छोटा पैलवान सुध्दा
आशीर्वाद मोलकळे
सन्मान करता वृध्दा
आत्मसन्मान जागृत
आवडे आबाल वृद्धा
चर्चा करे  सामंजस्ये
खुले  मार्ग प्रतिबध्दा
उदार दानाचे  महत्व 
कळेलं ना अतिबध्दा
गर्वांने पीडित वेदना
शाल्व प्रौड्रक उन्नदा
महत्व कुठले श्रमाचे
कळेन अयत्नसिध्दा
नकोकाही शिफारस 
प्रकाशमान  प्रसिध्दां
आत्मिकसुख मिळवे
पोहता प्रवाह विरुद्धा
भल्याकार्यात आडवे
तयार असे अवरुद्धा
उद्दिष्ट साध्य सिध्दता
काय सांगावे निर्बुद्धा
मळभ होई  भयभीत
पाहता चित्त विशुध्दा
मार्ग करतोय मार्गस्थ 
वाटसरुस  धारेशुध्दा
— हेमंत मुसरीफ पुणे. 
    9730306996..
   
Exit mobile version