सांगोल्याला निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणत असलेल्या पैशाची गाडी पुणे येथील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडली

सांगोला:
राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काल सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. तसेच सदर वाहन हे सत्तेतील काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल फेस आमदार शहाजीबापू पाटील यांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. असे शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई, मा.खा. विनायक राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनिलभाऊ कोकीळ व जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली असता वरील माहिती पोलिसांनी दिली असल्याचे सांगितले. यामुळे सांगोला तालुक्यासह विधानसभा मतदार संघातील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर रक्कम आणि इनोव्हा क्रिस्टा कंपनीची चारचाकी वाहन क्र. एमएच ४५ एएस २५२६ ही अमोल नवलडे यांच्या नावावर असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच तहसिलदार, प्रांतअधिकारी आदी दाखल झाले आहेत. तसेच आयकर विभाग, फाईंग स्कॉड देखील भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर वाहनात चार व्यक्ती असून यामध्ये एकजण संबंधित आमदाराचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम आगामी निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वापरली जाणार असल्याची चर्चा सांगोला विधानसभा मतदार संघात उठली आहे. परंतु हा पैसा घटनाबाह्य सरकारने भ्रष्ट मार्गाने चारचाकी वाहन क्र. एमएच ४५ एएस २५२६ ही अमोल नवलडे यांच्या नावावर असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच तहसिलदार, प्रांतअधिकारी आदी दाखल झाले आहेत.
तसेच आयकर विभाग, फाईंग स्कॉड देखील भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर वाहनात चार व्यक्ती असून यामध्ये एकजण संबंधित आमदाराचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम आगामी निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वापरली जाणार असल्याची चर्चा सांगोला विधानसभा मतदार कमविलेला आहे. त्यामुळे भ्रष्ट मार्गाने व घटनाबाहा मार्गाने स्थापन झालेल्या खोके सरकारमधून हे खोक्यांच्या माध्यमातून विविध मतदार संघात चाललेला पैसा आहे. परंतु या घटनाबाह्य सरकारने कितीही पैसा आणि खोके पुरवले, तरी मतदार संघातील स्वाभिमानी जनता सुज्ञ आहे. अशा भ्रष्टाचारी पैशाला कदापि न भुलणारी जनता आहे. त्यामुळे खोकेबहाद्दर सरकारला व आमदाराला येणाऱ्या विधानसभेमध्ये जनताच राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. सदर सापडलेल्या पैशासोबत विद्यमान सत्ताधारी आमदाराचा पुतण्या, झारीतील शुकाचाघ्र (मिनी आमदार) आणि दोन कॉन्ट्रॅक्टर असल्याचे समजत आहे. राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी आणलेल्या विकासकामांच्या निधीमधून टक्केवारी घेऊन कोट्यावधी रूपये मिळवले आहेत. कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. ५ हजार कोटी निधी आणल्याची भाषा वापरत आहेत. त्यामध्ये एक हजार ते १५०० कोटी रूपये आमदार शहाजीबापू पाटील यांनी भ्रष्ट मार्गाने मिळवले आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी आमदार शहाजीबापू पाटील य त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते यांच्या घरावर छापे टाकले तर भ्रष्ट मार्गाने मिळविलेले कोट्यावधी रूपये निवडणूक अधिकाऱ्यांना जप्त करण्यात यश येईल. सांगोला तालुक्यात भ्रष्ट मार्गान निवडणुकीत प्रचंड प्रमाणात पैसे येणार असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी आजपासून सांगोला तालुक्यात यंत्रणा लावावी अशीही मागणी संभाजीराजे शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग व राज्याचे निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे.
संजय राऊतांचे ट्विट
खा. संजय राऊत यांनी “मिधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड- शिवापूर टोलनाक्यावर १५ कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी काय डोंगर मिंधे यांनी निवडणूकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटींचा हा पहिला हप्ता…. काय बापू.. किती हे खोके?” असा सवाल टुिटद्वारे केला आहे.

ALSO READ  दि 14 ऑगस्ट अखंड भारत दिवसाच्या ह हर्षाणात तिरंगा अभियान सोहळा दिन साजरा

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000