सांगोला विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शने करीत माननीय श्री. दीपक आबा साळुंखे-पाटील, श्री,शहाजी बापू पाटील, श्री.बाबासाहेब देशमुख, श्री.अतुल पवार यांचे सह अनेकांच्या अर्ज दाखल

सांगोला:
सांगोला विधानसभेच्या आमदार पदासाठी आज आपापले भले मोठे शक्ती प्रदर्शन करत माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती अतुल पवार यांचे सह शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे सह त्यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी साधेपणा ने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.

आबासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांच्या सुरक्षते साठी तालुक्यातील भूपाळलेली गुंडगिरी तरुणांच्या हाताला काम शेतीसाठी पाणी या विषयावर बोलत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक असणार आहे शिवाय रॅली न काढता शक्ती प्रदर्शन न करणे यामुळे शासकीय यंत्रणेवर पडणारा ताण कमी होईल यासाठी अतिशय साधेपणाने अर्ज भरला असल्याचे श्री बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.


माननीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांचे कार्यालय पासून महात्मा फुले चौक नेहरू चौक व तहसील कार्यालय अशी भव्य रॅली काढत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला पुढे बोलत असताना मागील 40 वर्षातील विजयी उमेदवाराबरोबर काम करण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे मी दोन्ही आमदारांच्या विजयाचा सारथी होतो. माझी उमेदवारी जनरेटयामुळे दाखल केली आहे.मागील तीस वर्षा पासुन मी माझे सहकारी,मी आमदार असो अथवा नसो कार्यकर्ते चोवीस तास जनसामान्यांच्या अडचणी सोडवणेसाठी सांगोला येथे कार्यालय येथे उपलब्ध होतो आहोत आणि राहणार जनतेची सेवा करत राहणे असे मत माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.


 सांगोला शहर व परिसरात एमआयडीसी वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी मोठे अभ्यासिका उभारणे तरुणांच्या हाताला काम देणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये फूट पडल्याने याचा मला नक्कीच फायदा होईल व मीच विजयी होणार असं मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.


आज पर्यंत जिल्हा परिषद सदस्य असताना त्या अंतर्गत केलेल्या विकास कामाच्या जोरावर अपक्ष म्हणून अर्ज भरला असून जो विकास प्रस्ताव हिताच्या हातातच राहिला आहे तो गाव गाड्यापर्यंत वाढव आतापर्यंत पोहोचला पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली होती परंतु मिळाली नाही म्हणून अपक्ष भरण्याची गरज पडली असे मत श्री अतुल पवार यांनी व्यक्त केले.

ALSO READ  तांबोळी सोशल फाउंडेशन यांचे कडून हज यात्रेकरूंच्या सत्कार समारंभ सम्पंन  

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000