वंचित बहुजन आघाडी सांगोला शहर व तालूकाच्या वतीने देवेन्द्र फडणवीस यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या सुरूत लूटी विषयी केलेल्या निषेधात्मक वक्तव्या च्या विरोधात एकदिवसीय आंदोलन

सांगोला:

वंचित बहुजन आघाडी सांगोला शहर व तालूका च्या वतीने आज दिनांक :- १२-०९-२०२४ वार गुरूवार स ११ वा. तहसिल कार्यालया समोर देवेन्द्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरूत *लूटी विषयी केलेल्या निषेधात्मक वक्तव्या च्या विरोधात एकदिवसीय निषेध आंदोलन करणेत आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार आणि सोलापूर जिल्ह्याचे माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल जी चव्हाण महासचिव विशाल जी नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुटीवर जे वक्तव्य केलं ते इतिहास विरोधी आहे त्याचा निषेध म्हणून जोरदार घोषणा देऊन सदरचे आंदोलन पार पडले. सदर आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद भैय्या उबाळे, महासचिव स्वप्निल सावंत ,सचिव दीपक होवाळ, उपाध्यक्ष लकी उर्फ सुनील कांबळे, कपिल बनसोडे, तालुका संघटक समाधान होवाळ, शहराचे प्रमुख पोपट तोरणे, संतोष पवार , सुरज सोहनी , सर्जेराव उबाळे, मायाप्पा उबाळे, आकाश वाघमारे, नितीन धांडोरे , सागर पुणेकर, तसेच महीला आघाडीच्या रेश्माताई बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी होतें.

ALSO READ  विकास कामाला टक्केवारीचे गणित

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000