नांदेड जिल्हा प्रतिनिधि .
धम्मानंद भेदेकर चिटमोगरा
नुकत्याच घेण्यात आलेल्या मुस्लिम सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या बैठकीत नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शेख गौस रामतीर्थकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
ही निवड मुस्लिम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष फेरोज मसुलदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद एजाज पुणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
शेख गौस रामतीर्थकर हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या उत्साह,कामाची पद्धत व जनसंपर्क पाहून त्यांना मुस्लिम सेवा संघाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शेख गौस रामतीर्थकर यांच्या निवडीमुळे मित्र परिवारात उत्साह निर्माण होऊन शंकर नगर, रामतीर्थ,धुप्पा,नरसी सह ठिक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या निवडीबद्दल सरपंच प्र. राजेश तोडे पाटील,माजी सरपंच जल्लेवाड रामदास धुप्पेकर, जावेद चिटमोगरेकर,शेख मोहम्मद, इरफान पटेल, जल्लेवाड मामा, कुरेशी इस्माईल,शेख सलमान, भास्कर भेदेकर, मनोहर मोरे,शेख अफू,शेख फारुख,शेख अहेमद,शेख आजम,शेख मुर्तुजा,शेख मुस्तफा,सय्यद अजीम,शेख युसुफ,वाघमारे पप्पू , धम्मा भेदेकर चिटमोगरा सह आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.