भाजपचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – चेतनसिंह केदार-सावंत
जिल्हा ग्रामीण पश्चिमच्या मंडल अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
सांगोला (तालुका प्रतिनिधी): संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मंडल अध्यक्षांसंह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. बुथ समित्या अधिक सक्षम करा, पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करा, माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं आणि विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून सोलापूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्यासाठी नूतन पदाधिकार्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.
आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपने आता संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करत, त्या माध्यमातून आगामी निवडणुकासाठी तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पक्षाने संघटनात्मक बांधणीवर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या तालुका मंडल अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. सांगोला उत्तर मंडलाच्या (महूद, एखतपूर, जवळा जिल्हा परिषद गट आणि सांगोला शहर) तालुकाध्यक्षपदी अतुल प्रभाकर पवार तर सांगोला दक्षिण मंडलाच्या (कोळा, नाझरे, कडलास, घेरडी जिल्हा परिषद गट) तालुकाध्यक्षपदी दुर्योधन बाबा हिप्परकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच करमाळा शहर मंडल अध्यक्षपदी जगदीश अग्रवाल, करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्षपदी रामभाऊ ढाणे, माळशिरस ग्रामीण मंडल अध्यक्षपदी मामा पांढरे, अकलूज शहर मंडल अध्यक्षपदी रमेश व्होरा, सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा उपाअध्यक्षपदी महेंद्र पाटील, डॉ.जयंत केदार, दिलीप सावंत यांची निवड करण्यात आली आहे.