बाबुराव बंडगर (बी.आर.)यांच्या नेतृत्वाखाली कमलापुर भागातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कमलापुर गावचे नेते भाई बाबुराव धोंडीराम बंडगर(बी.आर) यांच्या नेतृत्वाखाली निरा उजवा फाटा क्रमांक ५ चा उप फाट्याला कमलापुर व परीसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरुन ही पाणी सोडले नसल्याने…व कायदा हा टेल टु हेड पाणी सोडण्याचा कायदा ,नियम असुन सुद्धा पाणी सोडले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या परीसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तरी शासनाने ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व हलगर्जीपणा करणाऱ्या संमंधीत अधिकाऱ्यांवरती योग्य ती नुकसान भरपाई द्यावी या मागणी साठी .. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सांगोला तहसील कार्यालयासमोर समोर सकाळी १०-०० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन बंडगर यांनी केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली