दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावणार – मविसे ; लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे दिले संकेत

सन्मान देईल त्यांच्याबरोबर पं.स.,जि.प.निवडणूक लढविण्याची घोषणा ; दहिगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन
प्रतिनिधी : नातेपुते : मौजे दहिगाव ता.माळशिरस येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बापू मोरे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राज्य समन्वयक अजित साठे,प्रदेश सचिव अनिल साठे,दहिगाव च्या सरपंच सोनम खिलारे,रणजित खिलारे,दत्ता रूपनवर,अक्षय डबडे,बापू वाघमारे,नातेपुते शहराध्यक्ष नारायण आवळे,उपाध्यक्ष अजय लांडगे,पिरळे गावचे शहराध्यक्ष राहुल खिलारे,उपाध्यक्ष रोहन सोनवणे,सचिव वैभव खिलारे,राहुल राणे,बापूराव बुधावले,मारकडवाडीचे शाखा अध्यक्ष महादेव मारकड,सचिन मारकड,पत्रकार सचिन रणदिवे,सतीश साठे,रफिक मुलाणी,सूरज मोहिते,दहिगावचे शहर अध्यक्ष सनी खिलारे,शाखा अध्यक्ष सचिन खिलारे,नाना पवार,धीरज साळवे,किसन खिलारे,मामा अवघडे,नाना खिलारे,सिद्धार्थ गंगणे,चांद मुलाणी,गौतम मोरे,सुनील जगताप,अनिल खिलारे,नितीन खिलारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावणार - मविसे ; लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे दिले संकेत
महाराष्ट्र विकास सेना पक्ष माढा लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत पक्षप्रमुख किरण साठे यांनी दहिगाव येथील शाखा उदघाटन प्रसंगी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना दिले.दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयासाठी लवकरच मंत्रालयामध्ये जावून विषय मांडून तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही किरण साठे यांनी दहिगाव आणि पंचक्रोशीतील जनतेला दिला आहे.तसेच लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षाला सन्मानपूर्वक जागा  देईल त्यांच्याबरोबर निवडणूक लढविण्याची घोषणा साठेनी केली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघात शाखा उदघाटन कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे.निमित्त जरी शाखा उदघाटन कार्यक्रमाचे असले तरी महाराष्ट्र विकास सेना पक्षाने तयारी मात्र निवडणुकीची सुरू केली आसल्याची चर्चा तालुक्यातील जनतेमध्ये चालू आहे.
ALSO READ  माढ्यात कोण बाजी मारणार? चक्क ११ बुलेट गाड्या ते थार मोटारीपर्यंत पैज..

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000