आमदार यशवंत माने यांचे हस्ते इंदापूर कृषि महोत्सव व प्रदर्शनाचे बहारदार उदघाटन.
इंदापूर कृषि महोत्सव व प्रदर्शनाचे बहारदार उदघाटन :
आमदार यशवंत माने यांचे हस्ते बुधवारी दुपारी इंदापूर कृषि महोत्सव २०२४ उदघाटन सोहळा संपन्न झाला,तर राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे हस्ते घोडे बाजार शुभारंभ व निरा भीमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांचे हस्ते आॅलंपिक घोडे सवारी प्रात्यक्षीक शुभारंभ संपन्न झाला.याप्रसंगी घोडे स्वारांनी प्रात्यक्षीके करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले,तर बुलेट शो च्या चित्तथरारक प्रात्यक्षीकांनी उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर सांस्कतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्तेदिप प्रज्वलन करून पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी छत्रपती सह.सा.
कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप होते.याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्यांचा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मोहळ विधानसभा आमदार यशवंतराव माने,छत्रपती सह.साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, उपसभापती रोहीत मोहळकर, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार,इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, कर्मयोगीचे संचालक वसंतराव मोहळकर,छत्रपतीचे मा.संचालक गणेश झगडे, विलासबापू वाघमोडे,कांतीलाल झगडे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतातुन आमदार यशवंत माने म्हणाले की २०२० साली इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे तात्कालिन सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर कृषि महोत्सवास सुरूवात केली.आणि पुणे जिल्ह्यातील एकमेव इंदापूर या ठिकाणी घोडे बाजार भरविण्याचा मान इंदापूर बाजार समितीला मिळवुन दीला. त्याबद्दल आप्पासाहेब जगदाळे यांचे अभिनंदन केले.आप्पासाहेबांनी काही दिवसापूर्वी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रीत करून बाजार समितीची निवडणुक लढविली व लोकांनीही तुम्हाला चांगली साथ देत विजय मिळवून दिला.त्याचप्रमाणे आपण इंदापूर कृषि महोत्सवात सुद्धा राजकीय जोडे बाजूला सारून तालुक्यातील सर्व पक्षातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांना एकत्रीत करून आज विचारपिठावर एकत्रीत आणले. इंदापूर तालुक्यात ही किमया फक्त आप्पासाहेब तुम्हीच शक्य करू शकता, असे गौरवोदगार आमदार यशवंत माने यांनी कृषि महोत्सव उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना काढले.
इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय,सामाजिक,क्षेत्रातील लोकांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करत असताना अशा गोष्टी सहजासहजी घडत नाहीत.तर लोकांचे आमच्यावर असलेल्या प्रेमापोटीच तालुक्यातील सर्व पक्षीय लोक एकाच विचार पीठावर उपस्थित झाल्याचे आप्पासाहेब जगदाळे म्हणाले.यावेळी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला अशा सर्वांचे मनापासुन अभिनंदन केले. उपस्थित सर्वांचे स्वागत आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने,उपसभापती रोहीत मोहळकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती दत्तात्रय फडतरे यांनी केले तर उपसभापती रोहीत मोहळकर यांनी आभार मानले.यावेळी संग्रामसिंह निंबाळकर,
मनोहर ढुके,संदिप पाटील, रूपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा,सुभाष दिवसे यांचेसह प्रभारी सचिव संतोष देवकर हे उपस्थित होते.
चौकट.
इंदापूर कृषि महोत्सव आदर्श पत्रकार पुरस्काराने श्री. बोराटे यांचा सन्मान.
कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित इंदापूर कृषि महोत्सव २०२४ अंतर्गत दैनिक उजनी टाईम्स चे मुख्य संपादक सुधाकर बोराटे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.