युसूफवडगांव पोलीस ठाण्याकडे बीड पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष
दै. तुफान क्रांती/बीड:
युसूफवडगांव पोलिसांच्या आशीर्वादाने मटका, जुगार, रिक्षांची बेकायदा वाहतूक, वाळूची बेकायदेशीर वाहतूक, नाक्यावरील लूट आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना युसूफवडगांव पोलिस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली स्थानिक गुन्हे शाखा वसुलीच्या कामात गर्क आहे.
बेकायदेशीर मटका जुगार दारू जोरात सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे. खुद्द बीड पोलिस अधीक्षक युसूफवडगांव पोलिसांकडे का दुर्लक्ष करत आहेत हेच समजत नाही या मुळे लहान लहान मुलांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत या मध्ये गोरगरीब व शेतकरी सर्वसामान्य यांच्या डोळ्यातील अश्रू वाढवण्याचे काम व बेकायदेशीर लोकांना युसूफवडगांव पोलिसांच्या मदत केली जात आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.
युसूफवडगांव पोलिस या बेकायदेशीर अवैद्य धंद्यांवरती कारवाई करणार का याकडे बऱ्या संघटनेचे व सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे तसेच रस्त्यावरील चॅटिंगच्या नावाखाली गोरगरिबांची लूट करणे पैसे न दिल्यास मारहाण करणे व शिवीगाळ करणे या बऱ्याच कारणांना युसूफवडगांव पोलिसांचा त्रासाला बळी पडावे लागत आहे या पोलीस स्टेशनमध्ये चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी असे जनतेतून वक्तव्य केले जात आहे.
या सर्व विषयावरती सामाजिक कार्यकर्ते अमीर मुलाणी यांनी पुराव्यांसोबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याशी पत्र व्यवहार करून स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या अधिकारांवरती काय कारवाई होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे यामध्ये हजारो गोरगरिबांना व त्यांच्या मुलांना पुन्हा जीवदान मिळण्याची शक्यता आहे लहान लहान मुले मटका जुगार गुटका दारू अशा व्यसनांना आहरी जाऊन हजारोंचे संसार उध्वस्त होत आहेत त्यापासून बचाव होऊ शकतो त्यामुळे अशा सर्व अवैध व्यवसायावरती कारवाई होणे खूप गरजेचे आहे या व्यवसायकांवरती बीड पोलीस अधीक्षक कारवाई करणार का पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या पथकांकडून कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.