विशालदादा पाटील यांच्या आटपाडी तालुका दौऱ्यास मोठा प्रतिसाद

आटपाडी दि . ३० ( प्रतिनिधी )

 

 देशातली इंडिया आघाडी आणि राज्यातल्या महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार आणि काँग्रेस आय पक्षाचे राज्याचे नेते विशालदादा पाटील यांचे आज आटपाडी तालुक्यातील अनेक गावात मोठ्या उत्साह आणि उत्स्फूर्त भावनेने स्वागत करण्यात आले .
आज सकाळी १० वाजता विशालदादा पाटील यांचे आटपाडी एस . टी . स्टॅन्ड परिसरात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले .
आटपाडी तालुका कॉग्रेस आयचे अध्यक्ष डी . एम . पाटील सर, काँग्रेस आयचे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष जयदिप भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिकभाई खाटीक, इंजिनीयर महेशकुमार पाटील, सामाजीक कार्यकर्ते अनिसभाई खाटीक, युवक नेते असिफ उर्फ बाबू खाटीक, अमित ऐवळे राजेंद्र जाधव, काकासाहेब जाधव, धनंजय देशमुख, रियाज शेख, संताजी जाधव, प्रताप जाधव, विक्रमसिंह जाधव, मयुर जाधव इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
गळवेवाडी, मुढेवाडी, निंबवडे, वाक्सेवाडी, पिसेवाडी, पळसखेल, दिघंची, लिंगीवरे, राजेवाडी, काळामळा, पुजारवाडी ( दिघंची ), पांढरेवाडी ( दिघंची ), उंबरगाव, दडसवाडी, विठलापूर, शेरेवाडी, आवळाई या गावच्या दौऱ्यावर आलेल्या विशालदादा पाटील यांना मोठया संख्येने उपस्थित राहून सर्वांनी उस्फूर्त दाद देत शुभेच्छा दिल्या .
ALSO READ  ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मोटरमन चंद्रशेखर सावंत सेवानिवृत्त

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000