कडलास:
कै.हनुमंतराव आनंदराव पाटील विद्या विकास मंडळ संचलित, बहुउद्देशीय प्रशाला कडलास येथे शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सोलापूर जिल्हा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त, सांगोला तालुक्याचे मनसे नेते माननीय विनोदजी बाबर साहेब यांच्याकडून बहुउद्देशीय प्रशालेतील गरीब, होतकरू, हुशार ,गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले .त्यामध्ये चित्रकला, वही ,पेन , पेन्सिल, कंपास पेटी, वह्या व शालेय बॅग (सॅक) इत्यादी साहित्य गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी सन्माननीय विनोद बाबर यांनी जाहीर केले की यापुढेही आपल्या शाळेतील गरीब व होतकर विद्यार्थ्यांना माझ्याकडून शक्य तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करेन .
तसेच जे विद्यार्थी चित्रकलेवर प्रभुत्व निर्माण करतील त्यांचा शैक्षणिक संपूर्ण खर्च देण्याचे त्यांनी मान्य केले . या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत त्यांचे इतर कार्यकर्ते हे होते . या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा पाटील, मुख्याध्यापिका संगीता शिंदे मॅडम , शशिकांत गायकवाड सर ,कडलास गावातील मनसे कार्यकर्ते व प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारत इंगवले सर यांनी केले व आभार एन.डी गाडेकर सर यांनी मानले.