नाझरे:
आबासाहेबांच्या निधनानंतर ही निवडणूक असून, यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे व आता आमचे आईबाप काढले जातात मग तुमचे काय करतील हे लक्षात घ्या. शेतकरी कामगार पक्ष हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत शिटी या चिन्हावर मतदान करून विजयी करा असे मत शेकाप चे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नाझरे ता. सांगोला येथील प्रचार सभेत व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सध्या सांगोला तालुक्याचा विकास केला म्हणता परंतु यांना दोघांना जाण्या येण्याचा रस्ता अजून नीट नाही व मान नदीत खड्डेच खड्डे पडले आहेत तसेच तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लावून दहशत व भयभीत वातावरण केले जात आहे त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे व तालुक्यातील जनता हीच खरी आबासाहेबांच्या विचारांची वारसदार आहे त्यामुळे आपला विजय नक्की आहे. नाझरे गाव व परिसर हा आबासाहेबांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे लालबावटा फडकणारच असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीस माजी उपसभापती सुनील चौगुले, स्वातीताई सरगर, सुनील बनसोडे, एडवोकेट शंकर सरगर, मा सरपंच गोपाळ सरगर यांनी बाबासाहेब देशमुख यांना विजयी करा असे आव्हान केले.
सदर प्रसंगी जि प सदस्य दादासो बाबर, मा. प्राचार्य सुबराव बंडगर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, मा. सरपंच संजय कोकरे, पिंटू बंडगर, उत्तम पाटील, विजय बंडगर, राजू बंडगर, सरपंच सौ मंदाकिनी सरगर, दर्याबा बंडगर, संजय सरगर, हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, उल्हास दादा धायगुडे, योगेश देवकुळे, अशोक पाटील, डॉक्टर विजय सरगर, गणी सो काजी, शशिकांत पाटील, मधुकर आलदर, प्रणाम चौगुले, उपसरपंच सौ. सुवर्णा पाटील, शिवाजी निंबाळकर, डॉ. धनाजी पारेकर, सुभाष कोकरे, आनंदा कोकरे, रामा चोरमुले, बंडू कोकरे, शिक्षक नेते भिवाजी कांबळे, बबन पाटील, समाधान वाघमारे, बाळासो वाघमारे, वसंत कुटे, अरुण रायचुरे, सचिन कोकरे, बाळासो चौगुले, युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील बनसोडे व शिवाजी सरगर यांनी तर आभार मा. उपसरपंच विजय गोडसे यांनी मानले.