आश्वासनांची पूर्तता न झालेस पुन्हा तीव्र आंदोलन – डॉ.सुधाकर वायदंडे यांचा इशार
तासगांव तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली तासगांव तहसील कार्यालयावर ‘घंटानाद मोर्चा ‘काढून ‘राहुटी आंदोलन’ छेडण्यात आले.
*छ. शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरवात झाली मुख्य मार्गावरून गणपती मंदिरामार्गे तहसीलवर मोर्चा नेण्यात आला.*
*मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांनी स्वीकारले परंतु जो पर्यंत तहसीलदार रवींद्र रांजणे येत नाहीत तो पर्यंत चर्चा होणार नाही व हे आंदोलन सुरूच राहणार अशी आंदोलकांनी भूमिका घेऊन प्रचंड घोषणाबाजी केली त्यामुळे तहसील आवारातील वातावरण दिवसभर तणावग्रस्त झाले होते त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.*
*रात्री ९ च्या सुमारास तहसीलदार रांजणे यांनी शिष्ठमंडळास बोलवून सुमारे दिड तास सकारात्मक चर्चा केली बैठकीच्या सुरवातीला वायदंडे यांनी पारधी समाजाचे सर्व प्रश्न व समस्या मांडल्या तहसीलदार यांनी मागण्याबाबत ठोस अंमलबजावणी करु पुनर्वसनाबाबत यादी तयार करणे,जातीचे दाखले, शिधापत्रिका देणे यासह सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा करून मागण्यांची पूर्तता न झालेस पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ.सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.*
*यावेळी दलित महासंघाचे प.महा नेते सदाभाऊ चांदणे,प.महा सरचिटणीस शामराव क्षीरसागर आप्पा,सुनिल मोरे सर,संभाजी मस्के, राजू वायदंडे,जेष्ठ पत्रकार अधिकराव लोखंडे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे राजू काळे,अशोक पवार, चरण पवार,जयश्री चव्हाण,उषा चव्हाण,काजल चव्हाण,सचिन पवार, कबुतर पवार,कोयन्या पवार,तेजस पवार यांच्यासह शेकडो पारधी बांधव आंदोलना सहभागी झाले होते.*या विशेष बातमीचा आढावा घेतला पत्रकार संदीप कांबळे यांनी