सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे संस्थापक मा सुरज बनसोडे यांचे दुःखद निधन
सांगोला प्रतिनिधी: सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण जिल्ह्यांतील जनता एका सडेतोड बोलणारया कार्यकर्त्याला मुकलीअसुन अन्यायाविरुद्ध आवाज उडवणारा असा कार्यकर्ता पुन्हा होणार नाही.
जनसामान्यांचा आधारवड कोसळला विविध मान्यवरांनी वाहिली आदरांजली
सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे संस्थापक मा सुरज बनसोडे यांचे गुरूवारी सायंकाळी दुःखद निधन झाले या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण जिल्ह्यांतील जनतेने सांगोला येथील भीमनगर कडे धाव घेतली व हळहळ व्यक्त केली काल शुक्रवारी सकाळी सांगोला येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुखमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शब्दात दुखमय भावना व्यक्त केल्या व हळहळ व्यक्त केली काहिनी जनसामान्यांचा आधारवड गेल्याची भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.