विशेष लोकअदालतीचे सर्वोच्च न्यायालयात आयोजन; २९ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान सुनावणी

तुफान क्रांती/ सांगोला: 
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या लोकअदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील यामध्ये सांगोला तालुक्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावीत, अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात.
 उपरोक्त लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने सहभागी होऊ शकतात. जिल्हयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे  आवाहन श्री. एस. एम. घुगे अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती सांगोला यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
लोकअदालतीचा फायदा
साध्या व सोप्या पध्दतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीच्या निवाडा अंतिमव अंमलबजावणी होऊ शकणार असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.
ALSO READ  शेतकरी कामगार पक्षाकडून शिवसेनेला मोठा धक्का !

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000