स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी;माळशिरस येथील दरोडा व घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद

नातेपुते येथील 03 घरफोडी चोरीच्या गुन्हयांची उकल 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेसह एकूण 11,55,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

दिनांक 09/08/2023 रोजी पहाटे 02.00 वा. ते 03.45 वा. चे दरम्यान केंजळेवस्ती, धर्मपूरी, ता. माळशिरस जि. सोलापूर येथे फिर्यादीचे राहते घराचे कुलुप तोडुन 4 लोखंडी पँयाच्या पेटया घराबाहेर घेवुन जावुन 1,45,000/- रू. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण 4,54,000/- रू. किंमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला म्हणून सुभाष नरहरी केंजळे, रा. केंजळेवस्ती, धर्मपुरी, ता. माळशिरस यांनी फिर्याद दिल्याने 253/2023, भादविसंक 457, 380 अन्वये गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मालाविशयी गुन्हयांचे संदर्भात आढावा बैठक घेवून, बैठकीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयातील, दिवसा व रात्री घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत तसेच जिल्हयातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणेबाबत श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे षाखा यांना सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे सहाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास घरफोडी चोरीचे गुन्हे व पाहिजे फरारी आरोपींचा षोध घेणेकामी आदेषीत केले होते.
सहा.पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे व त्यांचे पथक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणेकामी अकलुज शहरात हजर असताना, सपोनि नागनाथ खुणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 253/2023 भादविसंक 457, 380 प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार देवगन बापु उर्फ विजय पवार रा. आटपाडी याने त्याचे इतर साथिदार यांचेसोबत केला असून तो सध्या अकलुज षहरातील गांधी चैक येथे नातेपुतेकडे जाण्याकरीता थांबला आहे. त्यावेळी सहा.पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे व त्यांचे पथकाने त्याठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयांचे अनुशंगाने चैकशी केली असता त्याने त्याचे इतर साथिदारांसह मिळून मागील एक वर्शापूर्वी नातेपुते हद्दीतील धर्मपुरी येथे घरफोडीचा गुन्हा केले असल्याबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर सदर आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने व त्याचे इतर साथीदारासोबत माळषिरस येथे आणखी 02 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच त्याने गुन्हयातील चोरलेले 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 11,55,000/- रू. किंमतीचा मुददेमाल त्याचे सास-याचे राहते घरातून फौंडषिरस ता. माळषिरस जि. सोलापूर येथून हस्तगत केला आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे षाखेकडील सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास यष प्राप्त झाले आहे.
आरोपी नामे देवगन बापु उर्फ विजय पवार याचे कडून 02 घरफोडी चोरी व 01 चोरीचा गुन्हा उघडकीस आलेले गुन्हे:-
अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम
01.नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 253/2023 भादविसंक 457, 380 प्रमाणे.
02.नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 170/2024 भादविसंक 457, 380 प्रमाणे.
03.नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 171/2024 भादविसंक 380 प्रमाणे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे षाखेकडील सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास यष प्राप्त झाले आहे.
आरोपी नामे देवगन बापु उर्फ विजय पवार याचे वर दाखल असलेले गुन्हे:-
अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम
01.माळषिरस पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण 36/2021 भादविसंक 395, 397 प्रमाणे ( पाहिजे)
02.माळषिरस पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण 375/2021 भादविसंक 457, 380 प्रमाणे. (पाहिजे)
03.नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 277/2022 भादविसंक 457, 380 प्रमाणे.(अटक)
04.आटपाडी पोलीस ठाणे, सांगली. गुरनं 232/2020 भादविसंक 457, 380 प्रमाणे (अटक)
05.आटपाडी पोलीस ठाणे, सांगली. गुरनं 254/2020 भादविसंक 457, 380 प्रमाणे. (अटक)
06.आटपाडी पोलीस ठाणे, सांगली. गुरनं 415/2020 भादविसंक 379 प्रमाणे. .(अटक)
07.आटपाडी पोलीस ठाणे, सांगली. गुरनं 231/2023 भादविसंक 457, 380 प्रमाणे. (अटक)
08.आटपाडी पोलीस ठाणे, सांगली. गुरनं 267/2023 भादविसंक 457, 380 प्रमाणे. (अटक)
09.आटपाडी पोलीस ठाणे, सांगली. गुरनं 363/2023 भादविसंक 379 प्रमाणे..(अटक)
10.खंडाळा पोलीस ठाणे, सातारा. गुरनं 135/2023 भादविसंक 379 प्रमाणे. ( पाहिजे)
सदरची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ खुणे, सपोनि महारूद्र प्रजणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, विजय पावले महिला पोह/ मोहिनी भोगे, पोह/ धनाजी गाडे, सलीम बागवान, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, सागर ढोरे .पाटील, अक्षय डोंगरे, चालक पोना/ समीर शेख यांनी बजावली आहे.

ALSO READ  वासुद विकास सेवा सोसायटीवर भाजपचा झेंडा

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000