सोलापूर:
सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75 हजार मतांनी विजय मिळवलाय. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय. 1951 पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या. हा इतिहास आज मोडलाय.
सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशिलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पऱाभवाचा वाचपा काढला आहे.1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचलाय.