पंढरपूर:
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी ट्रायकॉन कॉन्ट्रॅक्टींग एलएलपी चे डायरेक्टर व्यंकट पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्रीगणेश कदम इत्यादी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन व स्थापत्य अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्याते व्यंकट पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दरम्यान महाविद्यालयाच्या वतीने व्यंकट पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान व्यंकट पाटील बोलताना म्हणाले, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना कोण कोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे. याच्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील भविष्यातील संधी, बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान प्रकल्पावर काम करत असताना लागणारे कौशल्य याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. स्थापत्य अभियांत्रिकी मधील निरनिराळ्या शाखांमधील प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी यादरम्यान व्यक्त केले.
स्ट्रक्चरल ऍनालिसिस डिझाईन इंजिनिअरिंग एस्टिमेशन अँड कॉस्टिंग या विषयाअंतर्गत असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना बद्दल त्यांनी विस्ताराने माहिती सांगितली. यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंग मधील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.