पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सविता उपल्ली यांचे :”बिझनेस एथिक्स” या विषयावर व्याख्यानई डी सी सेल ने आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाची सुरुवात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. सविता उपल्ली, डॉ. बाळासाहेब गंधारे आदींच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान प्रा. सविता उपल्ली यांनी बिजनेस एथिक्स या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याचे टाईप या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. यावेळेस टेक्नॉलॉजी आणि प्रोफेशन याबद्दल विशेष मार्गदर्शन ही केले. इथिकल मॅनेजमेंट मध्ये ह्युमन रिसोर्स रोल काय याबद्दल उदाहरण देऊन महत्वाची माहिती यादरम्यान सविता उपल्ली यांनी दिली.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी डॉ. बाळासाहेब गांधरे, प्रा. मनोज कोळी, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. सचिन घाडगे, प्रा. नितीन खपाले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.