अतिरिक्त कारभार अधिकारी म्हणून चार्ज देऊन सिरोंचा तालुक्यातिल जनतेचें होत आहे वस्त्र हरणं..?

प्रभारी अधिकाऱ्यांवर चालणाऱ्या सिरोंचा तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट करा —  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष सागर मूलकला यांची मागणी…..?
           महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका हा अती दुर्गम, नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे,
                 अशा या सिरोंचा तालुक्यात तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय सह असे अनेक कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयाचे कामे  सुरू आहेत,
              तालुक्यात ५० ते ६० किलोमीटर अंतरावरील असलेल्या  रेगुंठा, झिंगानुर, कोर्ला, कोपेला, पातागुडम, आसरअल्ली, अंकीसा असे अनेक गावातून तालुका मुख्यालयात येणारी शेतकरी वर्ग, महीला वर्ग असे अनेक लोकांना कार्यालयात विविध कामांची मोठी समस्या निर्माण होत आहे,
      प्रभारी अधिकाऱ्यांवर चालत आसलेल्या कार्यालयात प्रभारी अधिकार्याना दोन ते तीन जबाबदारी असल्याने  प्रभारी अधिकारी  वेळेवर लोकांना भेटत नसुन तीन ते चार दिवस कार्यालयाचे कामासाठी लोकांना  हेलपाटे मारावें लागत आहे.
     शासनाचे अनेक कल्याणकारी योजने पासून लोकांना वंचित रहावे लागत आहे,
              ही भाब  सिरोंचा तालुका करिता गंभीर जांचक विषय आणि समस्या असुन तालुका विकासासाठी तात्काळ केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन प्रभारी अधिकाऱ्यांवर चालणाऱ्या कार्यालयातील समस्या दूर करुन सिरोंच्यात मुख्य अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात यावी अन्यथा सिरोंचा तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट तरी करावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी सागर मूलकला यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे.
ALSO READ  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन 

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000